नाशिक: उत्तर प्रदेशातील गौतम बुद्धनगर येथील न्यायालयाने धनादेन न वटल्याप्रकरणी नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते; परंतु कारडा उत्तर प्रदेश पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्यामुळे नाशिक शहर गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने रविवारी (ता. ३) सकाळी द्वारका परिसरात सापळा रचून त्यांना अटक केली आहे. आठवडाभरापासून पथक त्याच्या मागावर होते.