नाशिक: जुने नाशिकमधील खडकाळी परिसरात पक्क्या बांधकामाचे दुमजली घर कोसळण्याची घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या नगररचना विभागाकडून तीस वर्षांपेक्षा जुन्या इमारती, वाडे, घरांचे संरचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्याच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नागरिकांना संरचनात्मक परीक्षणाचा अहवाल तातडीने विभागीय कार्यालयात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.