पंचवटी- पंचवटी परिसरातील अमृतधाम येथील विडी कामगारनगरातून तीन मुले रविवारी (ता. २९) दुपारपासून बेपत्ता झाली होती. मात्र, सोमवारी (ता. ३०) सकाळी या तिघांचे मृतदेह याच भागातील ‘द व्ही पार्क’ या साइटवर बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात आढळली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. संतप्त नागरिकांच्या आंदोलनानंतर बांधकाम व्यावसायिक, ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, महापालिकेनेही बांधकाम व्यावसायिकाला नोटीस बजावत खुलासा मागविला आहे.