Nashik News: मनमाड येथे रंगल्या रेड्यांच्या टक्करी; गवळी समाजाची अनेक वर्षांची परंपरा

bull fight is organised in manmad on bhaubeej nashik news
bull fight is organised in manmad on bhaubeej nashik news

Nashik News: दिवाळी हा आनंद आणि प्रकाशाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाडवा अर्थात बलिप्रतिपदेला मनमाड शहरातील गवळी समाज रेड्यांची आणि म्हशींची पूजा करत सगर म्हणजेच मिरवणूक मोठ्या उत्साहाने काढतात.

भाऊबीजच्या दिवशी अर्थात यमद्वितीयेला या रेड्यांची टक्कर लावली जाते. गेल्या अनेक वर्षापासून गवळी समाज ही परंपरा यंदाही जोपासत रेड्यांच्या टकरी झाल्या. श्वास रोखून धरणाऱ्या या टकरी पाहण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी झाली होती. ( bull fight is organised in manmad on bhaubeej nashik news)

'दिन-दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी' असं म्हणत वसूबारसेला गुरा-ढोरांची पूजा करुन पशुधनाप्रती आपण आपलं ऋण व्यक्त केले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून गवळी समाज दुभत्या म्हशींप्रति ऋण व्यक्त करण्यासाठी म्हैस, रेड्याची पूजा करून मिरवणूक काढतात.

पाडव्याला मनमाड शहरातील गवळी समाज रेड्यांची आणि म्हशींची सगर म्हणजेच मिरवणूक दरवर्षी मोठ्या उत्साहाने काढतो. सजवलेले रेडे आणि म्हशींना आकर्षक पद्धतीनं सजवून ढोल ताशांच्या गजरात रेड्यांचे मालक मोठ्या उत्साहात वाजत गाजत मिरवणूक काढून त्यांना लक्ष्मी माता मंदिरात होणाऱ्या या सोहळ्यात घेऊन येतात.

bull fight is organised in manmad on bhaubeej nashik news
Leonids Meteor Shower 2023: लिओनिड उल्कावर्षाव पाहण्याची आज संधी; निसर्गाचा आविष्कार अन खगोलप्रेमींसाठी पर्वणी

गवळी समाज पंच मंडळ, कारभाऱ्यांतर्फे रेड्यांच्या मालकांना मानपान दिला जातो. ही सगर म्हणजे मनमाडची एक ओळख आहे. भाऊबिजेला अर्थात यमद्वितीयेला रेड्यांची टक्कर लावली जाते. अनेक वर्षापासून ही अनोखी प्रथा शहरात पाळली जात आहे.

शहरातील बुधलवाडी रोडवरील मैदानावर रेड्यांच्या टक्करी लावण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत अनेक रेडे सहभागी झाले होते रेड्यांच्या टक्करींचा थरार पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. विजेत्या रेड्यांच्या मालकांना पारितोषिक देण्यात आली. रेड्यांच्या टक्करी जोपर्यंत लावत नाहीत, तोवर आमची दिवाळी साजरी होत नाही, असे गवळी समाज मानतो.

bull fight is organised in manmad on bhaubeej nashik news
Manoj Jarange Patil: येणारा काळ कसोटीचा... येवलेकरांनो सावध रहा! : मनोज जरांगे-पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com