Leonids Meteor Shower 2023: लिओनिड उल्कावर्षाव पाहण्याची आज संधी; निसर्गाचा आविष्कार अन खगोलप्रेमींसाठी पर्वणी

लिओनिड उल्कावर्षाव पाहण्याची आज संधी; निसर्गाचा आविष्कार अन खगोलप्रेमींसाठी पर्वणी
Opportunity today to see Leonids meteor shower nashik news
Opportunity today to see Leonids meteor shower nashik news Esakal
Updated on

Leonids Meteor Shower 2023: सिंह राशीतील मघा नक्षत्रात शुक्रवारी (ता.१७) मध्यरात्रीनंतर 'लिओनिड' उल्कावर्षाव पाहण्याची संधी मिळणार आहे. खगोल प्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार आहे.

मोकळ्या आकाशाखाली झोपून तेजस्वी दिसणारा उल्कावर्षाव पाहता येऊ शकतो. मैदानातून किंवा उंच गच्चीतून हे मनोहारी वैज्ञानिक दृश्य पाहण्याचे आवाहन खगोलतज्‍ज्ञांकडून केले जाते आहे. (Opportunity today to see Leonids meteor shower nashik news)

उल्कावर्षाव ही निसर्गाची एक विलोभनीय देणगी आहे. प्राचीन काळी लोकांना उल्का वर्षावाची भीती वाटायची. विज्ञान प्रगत होत असताना, ही भीती दूर होत गेली. सध्या खगोलप्रेमी उल्कावर्षावाची आतुरतेने वाट पाहत असतात. नोव्हेंबर महिना हा उल्का वर्षावाचा महिना म्हटला जातो. या महिन्यात छोटे-मोठे धरून एकूण पाच उल्कावर्षाव दिसू शकतात.

यामुळे दिसतो उल्‍कावर्षाव

उल्कावर्षाव हा धूमकेतूमुळे दिसतो. जेव्हा धूमकेतू सूर्यप्रदक्षिणा करून जातो, तेव्हा तो आपल्या मागे वायू आणि धूळ सोडत जातो. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा करताना या धुळीच्या मार्गातून जाते तेव्हा ही धूळ (खडक, धातू, वायू, बर्फ इत्यादी) पृथ्वीच्या गुरुत्वामुळे आकर्षित होऊन जमिनीकडे खेचली जाते. या उल्का सरासरी ताशी ५० हजार किलोमीटरच्या गतीने वातावरणातून प्रवेश करतात. पृथ्वीच्या वातावरणात आल्यानंतर हे खडक घर्षणामुळे जळायला सुरवात होते आणि सुंदर दृश्य निर्माण होते. बहुतेक उल्का या आकाशात जळून जातात.

Opportunity today to see Leonids meteor shower nashik news
Nashik News: दहा दिवसांत 8 हजार टन कचरा संकलित; फटाक्‍यांच्‍या कचऱ्यामुळे वाढले प्रमाण

असा पाहता येणार उल्‍कावर्षाव

उल्का दिसणे ही जितकी सुंदर बाब आहे, तितकेच उल्का निरीक्षण करणे अवघड आहे. एका दिशेने पाहिल्यास उल्का दिसत नाही. उभे राहून उल्का पाहणे कठीण आहे. पाठीवर झोपून किंवा आराम खुर्चीवरून पाहणे सोयीचे आहे.

उल्का पाहण्यास दुर्बीणीची गरज नसते. द्विनेत्री (बाइनाक्युलर) पण तितके सोयीचे नाही. उल्का निरीक्षण केवळ साध्या डोळ्याने सोयीचे आहे. शहराच्या दूर, जिथे कृत्रिम प्रकाश नसेल तिथेच जाऊन निरीक्षण केलेले उत्तम ठरते. शहरातून उल्का निरीक्षण करण्यासाठी उंच इमारतीवर जाता येईल.

"शुक्रवारी (ता.१७) रात्री (शनिवारी पहाटे) तीनच्या सुमारास ईशान्य (नॉर्थ-ईस्ट) क्षितिजावर मघा नक्षत्रातून उल्कावर्षाव होताना दिसेल. यावर्षी आकाशात चंद्रप्रकाशाचा जास्त अडथळा येणार नाही. तासाला ३०-३५ उल्का पडताना दिसण्याचा अंदाज आहे. शहराच्या बाहेर जाऊन निरीक्षण केल्यास उल्कावर्षाव चांगला दिसू शकतो."-सुदर्शन गुप्ता, खगोल अभ्यासक.

Opportunity today to see Leonids meteor shower nashik news
Nashik Winter Update: नाशिककर गारठले! पारा 14.2 अंशांवर; यंदाच्‍या हंगामातील निच्चांकी किमान तापमानाची नोंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com