पशुवैद्यकांच्या संपाने सर्जा-राजाचा मृत्यू; गावात हळहळ

bulls died
bulls diedesakal
Updated on

नाशिक : संपूर्ण राज्यात खासगी व शासकीय सेवेतील पदविकाधारक पशुवैद्यकांच्या संघटनांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. ऐन पावसाळ्यात त्याचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. झोडगे येथील कैलास साहेबराव देसले यांनी गेल्या वर्षी काही शिल्लक व नातेवाइकांकडून हातउसने घेत ६१ हजारांचा बैल विकत घेतला होता. रविवारी सकाळी सहाला नेहमीप्रमाणे बैलास चारा टाकण्यास गेले असता तो ऊठबस करत होता. त्यांनी गावातील पशुधन अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचा फोन बंद होता. (Bulls-die-due-to-veterinarian-strike-marathi-news-jpd93)

फोनाफोनीत गेला वेळ

खासगी पदविकाधारक पशुवैद्यकही संपामुळे उपचारास येऊ शकले नाहीत. मात्र चिखलहोळ येथील पशुधन पर्यवेक्षक डॉ. चौधरी यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले. त्यांनी काही औषधे लिहून पाजण्याचा सल्ला दिला, परंतु त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. पुन्हा पदविकाधारक पशुवैद्यक डॉ. विशाल पगार यांना विनंती करून बळजबरीने उपचारासाठी नेले. डॉ. पगार यांनी उपचारापूर्वी पशुधन विकास अधिकाऱ्यांची परवानगी व मार्गदर्शन मागण्यासाठी डॉ. गांगुर्डे यांना फोन केला परंतु त्यांचा फोन बंद आला.

माहिती घेईपर्यंत बैलाने सोडला प्राण

डॉ. जावेद खाटीक (मालेगाव) यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी पशुधन विकास अधिकारी डॉ. सोमनाथ चव्हाण यांना फोन करण्यास सांगितले. चव्हाण यांनी पुन्हा डॉ. गांगुर्डे यांना फोन करण्यास सांगितले. पशुधन विकास अधिकारी डॉ. गांगुर्डे व डॉ. चव्हाण यांनी फोनवर उपचार व बैलाची परिस्थिती माहिती करून घेईपर्यंत जवळजवळ चार तास उशीर झाला होता. उपचारांची सुरवात करतानाच बैलाने प्राण सोडला. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे देसले कुटुंबीयांना आपला सर्जा-राजा गमवावा लागला. कैलास देसले व गणेश देसले कुटुंबीयांनी आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून लाडक्या सर्जाच्या आठवणी सांगत टाहो फोडला. लाल फितीच्या कारभाराने झोडगे (ता. मालेगाव) येथील देसले शेतकरी कुटुंबीयांवर उद्‍ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यास पशुवैद्यकीय सेवा वेळेत न मिळाल्याने एकसष्ट हजारांच्या खिल्लार बैलाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

माझा लाडका सर्जा गेला, त्याचे दुःख अतोनात आहे; परंतु त्याहून जास्त मी त्याला वेळेवर उपचार उपलब्ध करून देऊ शकलो नाही याचे आहे. -गणेश देसले, पशुपालक शेतकरी, झोडगे

bulls died
नाशिकच्या धरण परिसरात पावसाची बॅटिंग, तरी पाणीकपात कायम
bulls died
राज्यातील किल्ल्यांची हेळसांड खपवून घेणार नाही : राज ठाकरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Education expert Bhausaheb Chaskar urged immediate restructuring of the Teacher Eligibility Test to improve the quality of school education.
Tukaram Mundhe milk adulteration complaint
Who is Prashant Wadile?
MP Supriya Sule
Marathi News Esakal
www.esakal.com