Nashik Crime News : कहांडळ वाडीत लष्करात असलेल्या भावंडांकडे भर दुपारी घरफोडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Burgled house

Nashik Crime News : कहांडळ वाडीत लष्करात असलेल्या भावंडांकडे भर दुपारी घरफोडी

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर तालुक्यातील वावी जवळ असलेल्या कहांडळवाडी गावात गुरुवारी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सुमारे साडेसात तोळे सोन्याचे दागिने व पाच हजार रुपये रक्कम लंपास केल्याची घटना घडली. (Burglary in Kahandal wadi of Sinnar taluka in afternoon nashik crime news)

मिराबाई रावसाहेब वाघ या आपल्या दोन सुना व नातवंडांसोबत कहांडळवाडी गावात राहतात. त्यांची दोनही मुले भारतीय सैन्य दलात नोकरीत असून मोठा भगवान पंजाब तर धाकटा शंकर दिल्लीला आहे.

भगवान हा मागच्या आठवड्यात सुट्टी घेऊन गावी आला असून दोन दिवसांपासून पत्नी अश्विनी हिच्या सोबत बाहेरगावी गेला होता. तर शंकर याची पत्नी शहा येथील एस.डी. जाधव पब्लिक स्कूलमध्ये नोकरीला असून ती नेहमीप्रमाणे कामावर गेली होती.

मीराबाई या देखील सकाळी घरातील कामे आटोपून नित्यक्रमानुसार शेतात गेल्या होत्या. दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास त्यांना गावातील काही मुले मळ्यात घ्यायला गेली. त्या घरी आल्यावर चोरीचा प्रकार घडल्याचे त्यांना सांगण्यात आले.

हेही वाचा: Jalgaon Crime News : एक कोटी 22 लाखाची वसुली पवारांच्या घरात!

अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतल्या खोलीत कपाटाची उचका पाचक करून अश्विनी हिचे ठेवलेले दागिने हस्तगत केले. तसेच पाठीमागच्या खोलीत मीराबाई यांच्या बॅगा उचकून त्यात ठेवलेले दागिने व सुमारे पाच हजार रुपये रक्कम चोरट्यांनी लांबवली.

या घटनेत जवळपास साडेसात डोळे सोन्याचे दागिने चोरट्यांच्या हाती सापडले. पोलीस पाटील रवींद्र खरात यांनी याबाबत वावी पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर उपनिरीक्षक विजय सोनवणे, हवालदार दशरथ मोरे, नितीन जगताप यांनी धाव घेत घटनेची माहिती घेतली.

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

हेही वाचा: Pune Crime: पुण्यातील उच्चभ्रु परिसरात चोरांचा सुळसुळाट, पोलिसांनी केली 'ही' कारवाई!

बंटी आणि बबलीवर संशय...

दीड वाजेच्या सुमारास वाघ यांच्या घरासमोर काळ्या रंगाची दुचाकी उभी होती. व शेजारी गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेली महिला फोनवर बोलत असल्याचे बाजूच्या घरातील महिलांनी बघितले.

कदाचित वाघ यांच्याकडे पाहुणे आले असतील म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र दुचाकी गेल्याचा आवाज आल्यावर या महिला वाघ यांच्या घराकडे आल्या असता घराचा एक दरवाजा उघडा असल्याचे व पडदा ओढल्याचे दिसून आले.

या महिलांनी घरात डोकावून पाहिले असता घरात कोणीही नव्हते व कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकल्याचे आढळले. त्यामुळे चोरीच्या या प्रकाराचा संशय त्या अज्ञात दुचाकीस्वारांकडे वळला आहे.

हेही वाचा: 'होय... तुमच्या मुलीला पळवून नेतोय'; अल्पवयीन मुलीला पळवत लग्न केलेला आरोपी जेरबंद | Aurangabad Crime