Latest Crime News | शहरात अडीच लाखांच्या घरफोड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

burglary

Nashik Crime News : शहरात अडीच लाखांच्या घरफोड्या

नाशिक : शहरात घरफोड्यांचे प्रकार सुरूच आहे. वेगवेगळ्या भागातील दोन घरफोड्यांत अडीच लाखाचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. आडगाव आणि सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Burglary of two half lakhs in city Nashik Latest Crime News)

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....पहिली घरफोडी आडगाव शिवारात उघडकीस आली. म्हाडा सोसायटीत राहणारे सुनीता भास्कर सोनवणे (रा. न्यू इंग्लिश शाळेजवळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सोनवणे कुटुंबीय गुरुवारी (ता. १) कामानिमित्त घराबाहेर पडले असता, चोरट्यांनी बंद घर तोडून तीन हजाराची रोकड व सोन्या- चांदीचे दागिणे असा सुमारे एक लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना सातपूर येथील महादेववाडी भागात उघडकीस आली.

विजया जिभाऊ धिवरे (रा. मराठी शाळेमागे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. धिवरे कुटुंबीय बुधवारी (ता. ३०) सायंकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले असता, चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेले सुमारे ७१ हजार रुपये किमतीचे सोन्या- चांदीचे दागिणे चोरून नेले. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.