Nashik News : भडगाव बारीत वऱ्हाडाच्या बसला अपघात; 2 ठार; 18 जखमी

Accident News
Accident Newsesakal

मालेगाव : वडनेर-म्हसदी रस्त्यावरील भडगाव बारीत (ता. साक्री) वऱ्हाडाच्या स्कुलबसला अपघात झाला. यात बसमधील दोघे वऱ्हाडी जागीच ठार तर अठरा जण जखमी झाले. ठार झालेल्यांमध्ये एक वृध्दा व अकरा वर्षीय मुलीचा सहभाग आहे.

चिंचवे (ता. मालेगाव) येथून लग्न सोहळ्यासाठी शुक्रवारी (ता. २) साक्री येथे हे वऱ्हाड जात असतानाच सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. वऱ्हाडासाठी करण्यात आलेली स्कुल बस चालकाचा ताबा सुटल्याने भडगाव बारीत वळणावर उलटली. त्यातूनच हा अपघात झाला.

हा अपघात मालेगाव व साक्री तालुक्याच्या सिमेवरील भडगाव बारीत झाला. रामपूरा हे तालुक्यातील अखेरचे गाव तर भडगाव साक्री तालुक्यातील अखेरचे गाव आहे. बारी गावापासून नजीकच असल्याने भडगाव गावातील युवक जखमींना मदत करण्यासाठी तातडीने धावले. त्यांनी बसमधून जखमींना बाहेर काढले. (Bhadgaon bus accident in Nagaon Bari two killed Eighteen injured Nashik News)

Accident News
Nashik Crime News : मांडूळ बाळगणाऱ्याला अटक; वनविभागाच्या कारवाईत 2 मांडुळ जप्त

अपघातानंतर जखमींना तत्काळ वडनेर खाकुर्डी प्राथमिक आरोग्य केंद्रात व तेथून येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी एका गर्भवती महिलेची प्रकृती अंत्यवस्थ असल्याने तिला नाशिक येथे हलविण्यात आले. या अपघातात मखमलाबाई बारकु ह्याळीज (वय ६०, रा. करजगव्हाण) व मयुरी विकास बोरसे (वय ११, रा. कोपरगाव) या दोघी जागीच ठार झाल्या.

अपघातातील जखमींची नावे अशी : पुनम पाटील (वय १०), श्रद्धा पाटील (वय १३), जे. पाटील (वय ४०, तिघे रा. सुरत), लावण्या चव्हाण (वय ९ रा. जळगाव), मीराबाई बोरसे (वय ३६, रा. शिर्डी), निकीता साळवे (वय २५), चित्राबाई साळवे (वय ५५), मंगलबाई देवरे (वय ५०), शंकर पवार (वय ५९), रविणा साळवे (वय २०), गायत्री साळवे (वय १४), बापू साळवे (वय ६०), सुमनबाई खैरनार (वय ६८), सुवर्णा साळवे (वय ४०), मंगलबाई साळवे (वय ४८, सर्व रा. चिंचवे). याशिवाय अन्य काही जखमींवर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अंत्यवस्थ असलेल्या महिलेला नाशिक येथे हलविण्यात आले आहे. अन्य जखमींच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

Accident News
Mechanized Agriculture : यांत्रिकी शेतीचा फायदाच फायदा!; मजूर टंचाईवरही तोडगा

चिंचवे येथील संदीप साळवे यांच्या मुलीचा शुक्रवारी साक्री येथे विवाह होता. या विवाहासाठी हे वऱ्हाड खासगी स्कूल बसने (एमएच ४१ एव्ही ९८०५) साक्री येथे म्हसदी मार्गे जात असताना भडगाव बारीतील अपघाती वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले व बस खाली कोसळली. कोसळतांना बसने चार ते पाच पलट्या घेतल्याचे जखमी व प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. चिंचवे येथील काही वऱ्हाडी खासगी वाहन, दुचाकी, चारचाकीने बसमागून येत असल्यामुळे अपघाताची तत्काळ माहिती मिळाली.

स्थानिकांच्या मदतीने वऱ्हाडींना बसमधून तातडीने बाहेर काढत रुग्णवाहिका व मिळेल त्या वाहनाने येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. बसवरील नियंत्रण सुटताच चालक दीपक अहिरे याने धावत्या बसमधून बाहेर उडी घेत बस सोडून दिल्याचे जखमींनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच साक्रीचे उपनिरीक्षक आनंद कोकरे, कैलास पाटील, हवालदार डी. आर. कांबळे, पोलिस शिपाई आनंद चव्हाण, विशाल परदेशी, सचिन बच्छाव व सहकारी घटनास्थळी दाखल झाल

जखमींना सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. अपघातातील मयत मयुरीची आई मीराबाई बोरसे यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना नाशिक येथील संदर्भ रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे यांनी सामान्य रुग्णालयात जावून जखमींची विचारपूस केली. या अपघात प्रकरणी रात्री उशिरापर्यंत साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Accident News
Nashik News : ताहाराबाद बसस्थानकात सुविधांचा बोजवारा; प्रवाशांची नाराजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com