शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत स्वप्नांची माती; तीन हेक्टर ऊस जळून भस्मसात, लाखों रूपयांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sugarcane nifad.jpg

आधीच अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे खूप नुकसान झालेले असतांना आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे.अशातच ऊस जळीताच्या घटनांनी आर्थिक संकट अधिक गङद झाले आहे.तरी जळीत झालेल्या ऊसाची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत स्वप्नांची माती; तीन हेक्टर ऊस जळून भस्मसात, लाखों रूपयांचे नुकसान

सायखेडा (जि.नाशिक) : निफाड तालुक्यातील शिंगवे येथील शेतकरी बन्सीलाल खंडेराव डेर्ले यांच्या शेतीमधील एक हेक्टर तसेच शहाजी मधुकर ङेर्ले यांच्या शेतीमधील दोन हेक्टर ऊस वीज तारांचे घर्षण होऊन शॉर्टसर्किट होवून लागलेल्या आगीत जळून खाक झाले. त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे.

तीन हेक्टर ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक

उसाला आग लागताच शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण आगीने उग्र रूप धारण केल्याने शेतकऱ्याचे प्रयत्न विफल झाले. अखेर ऊस जळून खाक झाल्याने लाखों रूपयांचे नुकसान झाले. आधीच अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे खूप नुकसान झालेले असतांना आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे.अशातच ऊस जळीताच्या घटनांनी आर्थिक संकट अधिक गङद झाले आहे.तरी जळीत झालेल्या ऊसाची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा > जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून 'जोडप्याला' भेटतात तेव्हा..!...

वीज तारांची दुरूस्तीची मागणी

शिंगवे सह गोदाकाठ परिसरातील शिवारांमध्ये वीज तारा लोंबकळत असलेल्या दिसतात. अनेकदा तारांच्या घर्षणाने शॉर्टसर्किटच्या घटना घडत असतात.वीज महा वितरण कंपनीने त्वरीत वीज तारांची दुरूस्ती करण्याची मागणी गोदाकाठ परिसरातून होत आहे.

हेही वाचा > नाशिकच्या गुलाबी थंडीत हॅलिकॉप्टरने अचानक आमीर खानची एंट्री होते तेव्हा..!..

loading image
go to top