Nashik Bus Fire
sakal
नाशिक: नंदुरबार- नाशिक मार्गावरील प्रवाशांनी भरलेल्या बसला तांत्रिक अडचण उद्भवली. मात्र प्रसंगावधान राखत प्रवाशांना खाली उतरवत इतर बसची व्यवस्था केली आणि दुरुस्तीसाठी नेत असताना पाथर्डी फाटा परिसरात अचानक पेट घेतल्याने नादुरुस्त बस आगीत भस्मसात झाली. बुधवारी (ता.१७) दुपारी घडलेल्या या ''बर्निंग बस''चा थरार नाशिककरांनी अनुभवला. लायनर तापल्याने बसला आग लागल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.