जुने नाशिक- राज्य परिवहन महामंडळाच्या ई-शिवाई बसचा चालक आणि वाहकाच्या प्रामाणिकपणामुळे प्रवाशांना २५ लाखांचे दागिने परत मिळाले. दागिन्याची बॅग हातात पडताच संबंधित प्रवासी दांपत्यांना अश्रू अनावर झाले. आगार प्रमुखांनी दोघांच्याही प्रामाणिकपणाचे कौतुक करत त्यांचा सत्कार केला. त्यानंतर दोघेही कर्मचारी पुढील सेवेस रवाना झाले.