जुने नाशिक: पौर्णिमा बस स्टॉप परिसरात रविवारी (ता. २४) दुपारी नाशिक रोड ते लेखानगर दरम्यान धावणाऱ्या सिटी लिंक बसच्या (एमएच १५ जीव्ही ७६९३) टायरला अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. या बसमध्ये एकूण १७ प्रवासी प्रवास करत होते. आगीचे लोट निघताना नागरिक आणि चालकाच्या लक्षात आल्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवली व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले.