Nashik News : 30 वर्षांपासून सुरु असलेली बससेवा अचानक बंद!

नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय
school students waiting for the bus at warkheda
school students waiting for the bus at warkhedaesakal

वणी (जि. नाशिक) : गेल्या तीस वर्षापासून दिंडोरी वरखेडा मार्गे पिंपळगाव जाणारी महामंडळाची बससेवा अचानक पंधरा दिवसापासून बंद करण्यात आल्याने या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांसह विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देवूनही दखल न घेतल्याने प्रवासी, विद्यार्थी आणि नागरिक यांच्याकडून याबाबत रोष व्यक्त करण्यात येत आहे. (Bus service been running for 30 years suddenly stopped at wani nashik Latest Marathi News)

दिंडोरी, वलखेड फाटा, लखमापूर फाटा, परमोरी, वरखेङा, कादवा सहकारी साखर कारखाना, सोनजांब फाटा, बोपेगाव व खेडगाव आदी गावातून शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, सरकारी कामे, हॉस्पिटलमध्ये उपचार, बाजारपेठा व अन्य कामांसाठी जाणारे नागरिक आदी प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी पिंपळगाव आगारातून दिंडोरी वरखेडा मार्ग पिंपळगाव बस नियमित असते. मात्र मागील पंधरा दिवसांपासून ही बस कुठलेही कारण न देता बंद करण्यात आली आहे.

यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बस बंद झाल्याने नागरिक, विद्यार्थी यांना जीव धोक्यात घालून खासगी प्रवासी वाहतुकीचा पर्याय अवलंब करावा लागत आहे. यामुळे वेळ आणि आर्थिक नुकसान देखील होत आहे. त्यामुळे ही बससेवा पुन्हा सुरु करण्याची मागणी येथील ग्रामस्थ, विद्यार्थी करत आहे. जर लवकरात लवकर ही बससेवा पुन्हा सुरळीत न केल्यास या भागात रास्ता रोको करण्याचा इशारा देखील ग्रामस्थ यांनी दिला आहे.

हेही वाचा : Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

school students waiting for the bus at warkheda
Nashik Crime News : जानोरी शिवारातील गोदामावर छापा; 19 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

"बससेवा बंद झाल्याने शालेय विद्यार्थी यांना शाळेत जाण्यासाठी ऊसतोड कामगारांच्या ट्रॅक्टर अथवा बैलगाडीतून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थी यांचे मोठे शालेय नुकसान होत आहे. यासह इतर कामासाठी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ यांचीही गैरसोय होत आहे. त्यामुळे ही बससेवा पुन्हा सुरु करावी." - केशव वाघले, सरपंच वरखेङा

"आम्ही दररोज वरखेडा येथून कादवा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात शिक्षणासाठी जातो. गेल्या अनेक दिवसांपासून शालेय वेळेत पिंपळगाव येथे जाणारी बस बंद झाल्याने, व अनियमित बस सेवा मुळे आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे. असून त्वरीत दखल घ्यावी." -समृद्धी गांगुर्डे, विद्यार्थीनी

school students waiting for the bus at warkheda
Nashik News : मालेगावात रस्त्यांची धुळधान; खराब हवामानामुळे विकारांनी जखडले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com