Diwali 2023: प्रवाशांनी फुलली बसस्‍थानके विद्यार्थी, चाकरमान्‍यांना लागले घराचे वेध

Bus stations were full of passengers returning home to celebrate diwali nashik news
Bus stations were full of passengers returning home to celebrate diwali nashik newsesakal

Diwali 2023 : दिवाळीच्‍या सणाला सुरवात झालेली असताना घरापासून लांब राहाणारे विद्यार्थी, चाकरमान्‍यांना घराचे वेध लागले आहेत. सण साजरा करण्यासाठी स्‍वगृही परतणाऱ्या प्रवाशांनी शुक्रवारी (ता. १०) बसस्‍थानके फुलली होती.

प्रवाशांच्या सुविधेसाठी जादा बसगाड्या उपलब्‍ध करून दिल्‍या असल्‍याने सध्यातरी त्‍यांची गैरसोय टळते आहे. (Bus stations were full of passengers returning home to celebrate diwali nashik news)

महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळातर्फे दिवाळीनिमित्त जादा बसगाड्यांची उपलब्‍धता करून दिलेली आहे. त्‍याचा फायदा घेताना प्रवासी एसटी बसने प्रवास करत आहेत. शुक्रवारी नवीन सीबीएस बसस्थानकावरून धुळे, छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक राहिले.

त्‍यापाठोपाठ पुणे मार्गावर प्रवाशांचा ओघ होता. जुने सीबीएस बसस्थानकावरून सटाणा, देवळा यांसह साक्री, नंदुरबारला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक राहिली.

Bus stations were full of passengers returning home to celebrate diwali nashik news
Diwali 2023: "जे मला उपदेशाचे डोस पाजतील त्यांना..." मराठी अभिनेत्रीने केले फटाके न फोडण्याचं आवाहन

महामार्ग बसस्थानकावरून कसाऱ्यासाठी जादा बसगाड्या सोडल्‍या जात आहेत. एसटी महामंडळाप्रमाणे खासगी ट्रॅव्‍हर्ल्सकडून वर्दळीच्‍या मार्गावर बसगाड्या उपलब्‍ध करून दिलेल्‍या आहेत.

माहेरवाशीनींची वाढणार गर्दी

लक्ष्मीपूजनाचा सण साजरा केल्‍यानंतर भाऊबीजसाठी माहेरी परतणाऱ्या माहेरवाशींनींची गर्दी वाढण्याची शक्‍यता आहे. महिलांना तिकीट दरामध्ये सवलत योजना उपलब्‍ध असल्‍याने बहुतांश महिला एसटीने प्रवासाला पसंती देत आहेत.

Bus stations were full of passengers returning home to celebrate diwali nashik news
Diwali Bank Holiday 2023: आजपासून सलग 5 दिवस बँका राहणार बंद, ATM मध्ये पैशांचा तुटवडा, जाणून घ्या पर्याय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com