Suicide
sakal
नाशिक: कोरोनामुळे व्यवसायात नुकसान झाल्याने मित्रांकडून उसनवार पैसे घेतले असता, राहिलेल्या चार लाखांच्या वसुलीसाठी संशयित मित्रांनी तगादा लावला. या जाचाला कंटाळून अखेर व्यावसायिक युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याप्रकरणी दोन संशयितांविरोधात इंदिरानगर पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अभिषेक अरुण महाजन (वय ३५, रा. आनंदिता सोसायटी, रामनगर, इंदिरानगर) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिक युवकाचे नाव आहे.