Unseasonal Rain: व्यावसायिकांचे आर्थिक बजेट कोलमडले; अभोण्यासह कसमादे पट्ट्यातील वीटभट्टी व्यवसायास फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Damage to brick kiln due to soaking in unseasonal rain.

Unseasonal Rain: व्यावसायिकांचे आर्थिक बजेट कोलमडले; अभोण्यासह कसमादे पट्ट्यातील वीटभट्टी व्यवसायास फटका

अभोणा (जि. नाशिक) : गेल्या तीन-चार दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे शेतीसह इतर व्यवसायांचे अतोनात नुकसान झाले आहे. अभोण्यासह कसमादे पट्ट्यातील वीटभट्टी व्यवसायास अवकाळी पाऊस व गारपिटीचा मोठा फटका बसला.

मातीच्या कच्च्या विटा पावसात भिजून चिखल झाला. अनेक दिवसांची मेहनत मातीत गेली. त्यामुळे वीट उत्पादकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. (Businessmens financial budget collapses Brick kiln business in Kasmade area along with Abhona Unseasonal Rain nashik news)

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

उन्हाळ्यात मातीपासून कच्च्या विटा तयार करून कडक उन्हात वाळविल्या जातात. वाळलेल्या विटांची विशिष्ट रचना करून त्या भट्टीत भाजल्या जातात. मात्र ढगाळ वातावरणामुळे कच्ची वीट ओलसरच राहिली. त्यात अवकाळी पावसाच्या तडाख्यात कच्च्या विटांचा पूर्ण चिखल झाला.

वीटभट्टी मजुरांची वानवा, त्यात व्यावसायिकांना सहा महिन्यांची मजुरी आधीच द्यावी लागते. कोळसा व मजुरी याचा अतिरिक्त खर्च वीटभट्टी व्यावसायिकांच्या माथी पडला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वीटभट्टी व्यावसायिकांनी शासनाकडे विमा सुरक्षा योजनेची वारंवार मागणी केली, मात्र याबाबत कोणतीही उपाययोजना केलेली नाही.

अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह असलेल्या व्यवसायावर आलेले आर्थिक संकट शासनाने मदत करून दूर करावे, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.

"अवकाळी पावसाने कसमादे परिसरातील सर्वच वीटभट्टी व्यावसायिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले. कोळसा व मजुरीचा अतिरिक्त खर्च वाढल्याने आर्थिक बजेट कोलमडले आहे. शासनाने आर्थिक मदत करून वीटभट्टी व्यावसायिकांना दिलासा द्यावा."- सोमनाथ सोनवणे, अभोणा, जिल्हाध्यक्ष, कुंभार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र प्रदेश

टॅग्स :NashikrainBusinessman