Nashik News : नाशिकमध्ये रोखला उंटांचा ताफा; तस्करीचा संशय, 2 उंटाचा मृत्यू

Camels being transported to Panjarpol.
Camels being transported to Panjarpol.esakal

Nashik News : राजस्थानकडून हैदराबादकडे जात असलेल्या सुमारे ९० उंटांचा ताफा तस्करीसाठी जात असल्याच्या संशयावरून नाशिकमध्ये आज (ता. ४) रात्री रोखण्यात आला. पशुप्रेमी तथा ॲनिमल वेल्फेअर ऑफिसरच्या नाशिक जिल्हा प्रतिनिधीने दाखविलेल्या सतर्कतेमुळे उंट पांजरपोळच्या जंगलात ठेवण्यात आली आहेत.

यात दोन उंटांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हे उंट बघण्यासाठी शहरवासीयांनी रात्री रस्त्यावर गर्दी केली होती. पोलिस बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला होता. (Camel fleet stopped in Nashik Suspected smuggling 2 camels dead Nashik News)

राजस्थान येथून हैदराबादकडे ८० ते ९० उंटांचा ताफा महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, साक्री, सटाणा या ठिकाणी नागरिकांना बघायला मिळाला. सदर उंट तस्करीसाठी जात असल्याची शंका नागरिकांना येत होती.

मात्र एवढी मोठी उंट पाहून ताफा अडवण्यास कोणीही तयार नव्हते. सदर उंट नाशिकमध्ये दाखल झाले. पशुप्रेमी तथा ॲनिमल वेल्फेअर ऑफिसर (मुंबई हायकोर्ट) नाशिक जिल्हा प्रतिनिधी पुरुषोत्तम आव्हाड यांनी तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस प्रशासन व महापालिकेला पत्रव्यवहार केला.

उंट तस्करीसाठी जात असल्याची माहिती दिली. याची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी उंटांना पांजरपोळच्या सुरक्षित जंगलात घेऊन जाण्याचे आदेश दिला. यानंतर मंगलरूप गोशाळा सेवा ट्रस्टची टीम तपोवन भागात दाखल झाली. उंटांना ताब्यात घेतले.

तपोवन, उपनगर, अशोका मार्ग, राजीव नगर परिसरातून उंटांना अंबड औद्योगिक वसाहतीनजीक असणाऱ्या पांजरपोळ येथे सुरक्षित नेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ही मोहीम सुरू होती.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Camels being transported to Panjarpol.
Ichalkaranji Crime: 'उसने घेतलेले पैसे दे, नाहीतर तुला जिवंत ठेवत नाही'; मित्रानेच मित्रावर केला खुनी हल्ला

अचानक उंटांचा भला मोठा ताफा पाहिल्याने नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त देखिल ठेवण्यात आला होता. या उंटामधील दोन उंट पंचवटी, तपोवन येथे मृत झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

"उंटांचा ताफा धुळे, नंदुरबार, साक्री, सटाणा या ठिकाणाहून जात असताना हे तस्करीसाठी जात असल्याचा संशय आला. याबाबत चौकशी केल्यानंतर उंटांच्या ताफ्यासमवेत असलेल्या ४० लोकांनी वेगवेगळी उत्तरे दिली. यामुळे तस्करीचा संशय बळावला. या लोकांवर खूप मोठा वरदहस्त असून प्रशासन आम्हाला सुरवातीला काही मदत केली नाही. मात्र यांना वाचविण्याची धडपड असल्याने मी ॲनिमल वेल्फेअरच्या सर्वेसर्वा तथा खासदार मनेका गांधी यांच्याशी संपर्क साधला. श्रीमती गांधी यांनी तत्काळ सूत्र हलविली. त्यांच्या मदतीमुळे आम्हास मोठा आधार मिळाला. पांजरपोळ व्यवस्थापनाशी संपर्क साधत सर्व उंट त्यांच्या जागेत ठेवण्याची विनंती केली. त्या विनंतीला मान ठेवून त्यांनी लागलीच होकार दिला."

- पुरुषोत्तम आव्हाड, पशुप्रेमी तथा ॲनिमल वेल्फेअर ऑफिसर, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

Camels being transported to Panjarpol.
Nashik Crime : रेशनच्या मालाचा अवैध साठा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com