Viral News : ऐकावं ते नवलच! शाकाहारी उंटाला खाऊ घालतात किंग कोब्रा, कारण...

दिवसेंदिवस काही न खाता पिता राहणारा उंट शाकाहारी प्राणी आहे. पण काही विशिष्ट प्रसंगी त्याला साप खाऊ घातला जातो आणि तो खातो ही, काय आहे कारण, जाणून घ्या.
Viral News
Viral Newsesakal

Vegetarian Camel Eating King Cobra : वाळवंटाचे जहाज म्हटला जाणारा उंट हा प्राणी आपण सर्वांनीच कधी ना कधी बघितलेला असतो. हा प्राणी वाळवंटात राहत असला तरी झाडांची पानं, फुलं खातो. त्याचा महत्वपूर्ण भाग हे त्याचं कुबड असतं. उंट याच भागात चर्बी साठवून ठेवतात. त्यामुळेच ते महिनोन् महिने पाणी आणि अन्ना शिवाय राहू शकतात.

Viral News
Farmer Viral Video : परतीच्या पावसानं पिकांचं नुकसान, व्यथित शेतकऱ्याची कविता व्हायरल

अशा शाकाहारी प्राण्याला विषारी साप का खाऊ घातला जातो? जाणून घ्या

उंटाला एक विशिष्ट आजार झाला की, तो खाणं-पिणं सोडून देतो. शरीर सुकायला लागतं. यावर मध्यपूर्वेत असं मानलं जातं की, यावेळी जर उंटाला विषारी साप खाऊ घातला तर तो बरा होईल. म्हणून उंटाचं तोंड उघडून साप टाकला जातो आणि लगेच पाणी पाजलं जातं, त्यामुळे साप आत जातो.

Viral News
Pune Bus Viral Video : बसमधील प्रवाशाचा हा व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहिलात?

धार्मिक मान्यता

या प्रकारामागे धार्मिक समज आहे. या आजाराला Hyam म्हटलं जातं. याचा अर्थ जिवंत साप गिळणे असा होतो. विषरी साप खाऊ घातल्यावर असं मानलं जातं की, त्याचं विष उंटाच्या शरीरात पसरतं, जेंव्हा त्याचा प्रभाव कमी होतो तेंव्हा उंटपण बरा होऊ लागतो. पण यामागे काणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत.

Viral News
पुण्यात पुन्हा घुमला 'काका मला वाचवा'चा गजर; PMPLमधल्या तरुणाचा Video viral

डॉक्टर याला करतात अमान्य

जनावरांचे डॉक्टर म्हणतात की, उंटांना हा आजार किड्यांच्या चावण्याने होतात. यामुळे उंटांचा गर्भपात व मृत्यू पण होऊ शकतो. याचे लक्षण ताप, डोळ्यांतून सतत पाणी गळणे, अशक्तपणा, शरीर फुगणे, शक्ती कमी होणे इत्यादी आहे. उपचार न मिळाल्याने Trypanosomiasis ने उंटाचा मृत्यू होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com