Malegaon Crime : अल्पवयीन मुलांच्या मदतीने सायकल चोरणाऱ्याला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nashik Crime : अल्पवयीन मुलांच्या मदतीने सायकल चोरणाऱ्याला अटक

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील प्रामुख्याने कॅम्प परिसरातील मोक्याच्या ठिकाणी व सोसायटींमधील अल्पवयीन मुलाच्या मदतीने सायकल चोरी करणाऱ्या आकाश बाबू नागरे (वय २२, रा. सोयगाव) याला कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. आकाशसह चौदा वर्षीय अल्पवयीन विधी संघर्षित मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Camp police arrested thief who stealing cycle with help of minors malegaon crime news)

कॅम्प पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून १९ जानेवारीला सायकल चोरीस गेली होती. या प्रकरणी कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश काळे व त्यांच्या पथकाने सायकल चोरी गुन्ह्याबाबत गोपनीय माहिती काढली.

त्यावेळी कलेक्टरपट्टा भागातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा त्यांच्या हाती लागला. त्याची चौकशी केली असता सायकल चोरीसाठी आकाश नागरे हा मदत करीत असल्याचे या मुलाने सांगितले. पोलिसांनी आकाशला अटक केली. अल्पवयीन मुलाला समज देऊन आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Nashik News : पती योग्यच निर्णय घेतील ना...

सोमवारी त्याला बाल न्यायालय उंटवाडी, नाशिक येथे हजर करण्यात येणार आहे. पोलिसांनी आकाशची कसून चौकशी केली असता त्याच्या ताब्यातून ४० हजार ५०० रुपये किंमतीच्या सहा रेंजर सायकली जप्त करण्यात आल्या. आणखी काही सायकली हस्तगत होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. आकाशला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

हेही वाचा: Nashik Crime News: चोरीच्या 592 दुचाकींचा लागेना शोध; पोलिसांवर दुचाकी चोरटे वरचढ