Nashik Crime News: चोरीच्या 592 दुचाकींचा लागेना शोध; पोलिसांवर दुचाकी चोरटे वरचढ

vehicle theft
vehicle theftesakal

नाशिक : शहर परिसरामध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. चोरीला गेलेल्या दुचाकींचा शोध लावण्यासाठी पोलिसांकडून गुन्हा नोंदवून घेण्यापलीकडे कोणत्याही ठोस उपाययोजना होत नसल्याने वाहनचालकांमध्येही आपल्या वाहनांबाबत असुरक्षिततेची भावना आहे.

दरम्यान, गेल्या वर्षभरात शहर हद्दीतून तब्बल ७३८ दुचाकी चोरट्यांनी लांबविल्या असून, यापैकी पोलिसांना केवळ १४६ दुचाकीच शोधण्यात यश आले आहे. यानुसार हे प्रमाण केवळ १९. ७८ टक्के प्रमाण असून, ८० टक्के दुचाकी शोधण्यात पोलिसांच्या पदरी अपयश आले आहे. यामुळे पोलिसांसमोर दुचाकी चोरट्यांचे मोठे आव्हान उभे राहिले असून, त्यासाठी ठोस उपाययोजना व विशेष मोहीम पोलिसांना हाती घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा: प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

२०२२ या वर्षभरात नाशिक पोलिस आयुक्तालय हद्दीतून ७३८ दुचाकी चोरट्यांनी लांबविल्या आहेत. यानुसार सरासरीनुसार दररोज दोन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. तर, पोलिसांना केवळ १४६ दुचाकींचा शोध घेण्यात यश आले आहे. हे प्रमाण अवघे १९.७९ टक्के इतकेच आहे. त्यामुळे पोलिसांना दुचाकी चोरटे वरचढ ठरले आहेत.

गतवर्षी तत्कालीन पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दुचाकी चोरट्यांचा आळा घालण्यासाठी आणि चोरीला गेलेल्या दुचाकींचा शोध घेण्यासाठी दोन पथके कार्यान्वित केली होती. या पथकांच्या माध्यमातून दुचाकी शोधून आणल्या खऱ्या, परंतु त्यातही ‘गोलमाल’ असल्याचीच चर्चा पोलिस वर्तुळात होती. त्यामुळे ‘ॲण्टी व्हेईकल थीफ टीम’ असूनही दुचाकी चोऱ्या थांबलेल्या नाहीत.

दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना अपयशच आलेले आहे, हेच गत वर्षाच्या आकडेवारीतून स्पष्ट होते आहे. त्यामुळे शहर गुन्हेशा खेला दुचाकी चोरीला आळा घालण्यासाठी ठोस मोहीम राबवावी लागणार आहे.

vehicle theft
Nashik: आपल्या शक्तीने कॅन्सर बरा करा अन् मिळवा 51 लाख रोख; नाशिकच्या महंतांकडून बक्षिस जाहिर

चोरीची ठिकाणं दुर्लक्षित

चोरट्यांकडून दुचाकी चोरीसाठी काही ठराविक ठिकाणे लक्ष्य केली जातात. गर्दीच्या ठिकाणी पार्क केलेली दुचाकी चोरीसाठी लक्ष्य केली जाते. ठक्कर बाजार बसस्थानक, गंगाघाट, मंदिरे-व्यापारी संकुलांच्या समोर पार्क केलेल्या दुचाकी चोरटे लक्ष ठेवून चोरतात. त्याचप्रमाणे, वॉचमन नसलेल्या सोसायट्या, इमारतीतून चोरटे रात्रीच्या वेळी दुचाकी चोरून नेतात.

आकडेवारी सांगते....

वर्ष - दुचाकी चोरी - सापडल्या

२०२२ - ७३८ - १४६

२०२१ - ५२४ - ९४

२०२० - ४१७ - ७०

२०१९ - ४६६ - ८५

vehicle theft
Nashik News : आरोग्यसेवेवरील वाढता ताण कमी होणार; राज्यातील 597 परिचारिकांच्या पदमंजुरी!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com