Crime
sakal
नाशिक: कॅनडा कॉर्नर येथील नामांकित सराफाच्या दुकानात आलेल्या दोघा भामट्यांनी सुमारे पावणे दोन लाखांचे सोन्याचे कॉइन खरेदी केले. पावणे दोन लाखांची रक्कम ऑनलाईन वर्ग केली. मात्र, त्यानंतर गुजरात पोलिसांनी सदरची रक्कम ‘होल्ड’ केल्याने भामट्यांनी फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवनकुमार राठोड, राहुल सोनी असे दोघा संशयित भामट्यांची नावे आहेत.