अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा ; चव्हाण

दीपिका चव्हाण : वळसे-पाटील, चाकणकर यांना निवेदन
Abuse of a minor girl
Abuse of a minor girlsakal

सटाणा : कल्याण (ठाणे) येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील सहा महिन्यांपासून झालेला अत्याचार प्रकरणाचा खटला तत्काळ जलदगती न्यायालयात चालवून, नराधमांना कठोर शिक्षा द्यावी, तसेच औरंगाबाद येथे ‘निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे’ असा जाहिरात फलक लावून महिलांचा अवमान करणाऱ्यावर त्वरित कारवाई करावी, अशी आग्रही मागणी बुधवारी (ता.२) राज्य महिला आयोगाच्या सदस्या व माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील व महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

Abuse of a minor girl
तळोदा : भाजप पदाधिकाऱ्यांनी ऐकली पंतप्रधानांची ‘मन की बात’

याबाबत बुधवारी मुंबई येथे माजी आमदार सौ. चव्हाण यांनी गृहमंत्री वळसे-पाटील व महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. चाकणकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनातम्हटले आहे, की कल्याण येथील अल्पवयीन मुलीचा बाप आणि तिचा भाऊ या मुलीवर काही महिन्यापासून अत्याचार करत होते. ही घटना मन सुन्न करणारी असून, मानवतेला कालिमा फासणारी आहे. ही बाब तिने आईला सांगितली. पीडित मुलीने हा प्रकार आईला सांगितला. मात्र आईने मुलीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून पती व मुलाच्या कृत्याला एकप्रकारे मूकसंमतीच दिली. अखेर शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिस ठाणे गाठून पीडित मुलीने हा प्रकार पोलिसांना सांगितल्याने ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे राज्यातील अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, घरातच वडील आणि भावाकडून सातत्याने होत असलेला अत्याचार दुर्दैवी आहे. त्यामुळे राज्य शासन व महिला आयोगाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि हा खटला तत्काळ जलदगती न्यायालयामध्ये चालवून नराधम वडील व भावावर कठोर कारवाई करून पीडितेला न्याय मिळवून द्यावा.

Abuse of a minor girl
नंदुरबार : ग्रामपंचायत सदस्यांना प्रशिक्षणातून पाणी नियोजनाचे धडे

तसेच औरंगाबाद येथे रमेश पाटील याने ‘महापालिका निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे’ अशा आशयचा जाहिरात फलक लावून महिलांचा अवमान केला आहे. राज्य शासन व महिला आयोगासह औरंगाबादच्या पोलिस आयुक्तांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत रमेश पाटील याच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणीही माजी आमदार सौ. चव्हाण यांनी निवेदनात केली आहे. राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी चव्हाण यांची शासनाने नियुक्ती केल्याबद्दल आयोगाच्या अध्यक्ष सौ.६ चाकणकर यांनी त्यांचा सत्कार केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com