Latest Marathi News | नराधम हर्षल मोरेविरुद्ध आता वेठबिगारीचा गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nashik Crime Update : नराधम हर्षल मोरेविरुद्ध आता वेठबिगारीचा गुन्हा

नाशिक : आधाराश्रमातील सात मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप असलेला म्हसरूळच्या ज्ञानदीप गुरुकुल आश्रमाचा संचालक हर्शल मोरे याच्या अनुसूचित जाती जमातीच्या अल्पवयीन मुलास स्वतःच्या फायद्यासाठी कागदी द्रोण बनविण्याच्या मशिनवर कामाला लावल्याप्रकरणी आडगाव पोलिसांनी वेठबिगारीचा गुन्हा नोंदविला आहे.

म्हसरूळ परिसरातील मानेनगर येथील द किंग फाउंडेशनअंतर्गत ज्ञानदीप गुरुकुल आधाराश्रमात उघडकीस आलेल्या संचालक हर्शल मोरे याच्या कृष्णकृत्याच्या चौकशीत रोज नवनवे गैरप्रकार उघडकीस येत आहेत. (Case of misdemeanor has filed against murder Harshal More Nashik Crime News)

हेही वाचा : असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

हेही वाचा: Nashik News : सिन्नर शिर्डी महामार्गावर अपघात; दोघे दुचाकीस्वार ठार

आत्तापर्यंत त्याने अल्पवयीन मुलींसह सात पीडितांवर अत्याचार प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे नोंदविले आहेत. मोरे सध्या पोलिस कोठडीत आहे. आडगावमधील वृंदावननगर परिसरात हर्शल मोरेचे निवासस्थान आहे.

तेथे त्याने आश्रमातील अनुसूचित जाती जमातीच्या एका अल्पवयीन मुलास स्वतःच्या फायद्यासाठी कागदी द्रोण बनविण्याचे मशिनवर कामाला लावल्याची तक्रार पीडित बालकाने केली. त्यानुसार बेकायदेशीर वेठबिगारीसह बालन्याय (मुलांची काळजी व संरक्षण)अधिनियम २००० चे कलम २६ सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ३ (१) (द) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त गंगाधर सोनवणे तपास करीत आहेत.

हेही वाचा: Nashik Crime News : बनावट विमान तिकिटे देवून प्रवाशांची फसवणूक