नाशिक : रंगपंचमीला पोलिसांच्या अटीं- शर्थींचा भंग; 5 मंडळांवर गुन्हा दाखल

Rang Panchami Nashik
Rang Panchami Nashikesakal

नाशिक : शहर पाेलिस आयुक्तालयाने दिलेल्या परवानगीतील अटी व शर्थींचा भंग करुन जुने नाशिक व भद्रकाली परिसरातील पाच सार्वजनिक मित्र मंडळांवर रंगपंचमीसाठी लाऊडस्पिकर लावल्याने गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी अटी व शर्थींच्या अधीन राहून दिली हाेती परवानगी

नवजीवन मित्र मंडळ, बालाजी युवक मंडळ, प्रेरणा मित्र मंडळ, सत्यम मित्र मंडळ, नवजीवन मित्र मंडळ आणि शिवसेना युवक मित्र मंडळ अशी गुन्हा दाखल झालेल्या मित्र मंडळांची नावे आहेत. शहर पाेलिस आयुक्तालयाच्या विशेष शाखेने रंगपंचमी निमित्त या पाच मित्र मंडळांना काही अटी व शर्थींच्या अधीन राहून परवानगी दिली हाेती. त्यात मिरवणूक काढू नये, डीजे व लाऊडस्पिकर वाजवू नये, पारंपारिक वाद्ये वाजवावीत, अशा स्पष्ट सूचना परवानगीत केल्या हाेत्या. मात्र, रंगपंचमीला या पाचही मंडळानी लाऊडस्पिकरवर बँन्जाे लावून उत्सव साजरा करतांना ध्वनी प्रदूषण केल्याने त्यानुसार या मंडळांवर पाेलिसांच्या परवानगीतील अटींचा भंग तसेच लाऊडस्पिकर वाजविला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार यांनी दिली आहे.

Rang Panchami Nashik
एसटी संप जीवावर बेतला! आणखी एका कर्मचाऱ्याची आत्महत्या

यांच्यावर झाली कारवाई

- सत्यम सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ, अध्यक्ष हरी आंबेकर
(रा. टाकसाळ लेन)

- प्रेरणा सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ, अध्यक्ष शिवा पारचे
(रा. नवापुरा)

- शिवसेवा युवक मित्र मंडळ, अध्यक्ष संदीप कानडे (रा.
गाडगे महाराज पुतळा मेनरोड)

- बालाजी मित्र मंडळ, अध्यक्ष गोविंद कांकरिया (रा. ठाकरे रोड)

- नवजीवन मित्र मंडळ, अध्यक्ष अतुल जाधव (रा. भद्रकाली)

Rang Panchami Nashik
नाशिक जिल्ह्यात 9 हजार मुलांना एकाच दिवशी पहिली लस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com