Nashik Crime News : रस्त्यात अडवून मारहाण अन् विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

molestation

Nashik Crime News : रस्त्यात अडवून मारहाण अन् विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

नाशिक : भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातील तक्रारीचा राग मनात धरून संशयिताने पीडितेला रस्त्या अडविले आणि मारहाण करून विनयभंग केला.

याप्रकरणी पंचवटी पोलिसात संशयित वसिम नासिर शेख याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case registered in the case of beating and molestation by blocking road Nashik Crime News)

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

पीडितेच्या फिर्यादीनुसार, पीडिता बुधवारी (ता.१५) दिंडोरी रोडवरील जलविज्ञान भवनाच्या गेटसमोरून अॅक्टिवावरून जात असताना, रिक्षातून आलेल्या संशयित वसिम याने पीडितेला रोखले.

पीडितेच्या बहिणीने भद्रकाली पोलिसात दाखल केलेले बलात्काराच्या गुन्ह्याचा राग मनात धरून संशयित वासिम याने पीडितेच्या छातीवर मारले आणि स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत विनयभंग केला. गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक डी.पी. खैरनार हे करीत आहेत.