Crime News : वाढदिवसाच्या पार्टीत ऑर्केस्ट्रा डान्सरला दारू पाजवून 6 जणांनी केला बलात्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uttar Pradesh Unnao

पार्टी करणाऱ्या तरुणांपैकी एकानं मला दारू मिसळून कोल्ड ड्रिंक पाजलं आणि दारूच्या नशेत असणाऱ्या आरोपीनं मला अंधारात ओढून नेलं.

Crime News : वाढदिवसाच्या पार्टीत ऑर्केस्ट्रा डान्सरला दारू पाजवून 6 जणांनी केला बलात्कार

त्तर प्रदेशातील उन्नावमध्ये (Uttar Pradesh Unnao) पुन्हा एकदा तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आलीये. पीडित मुलगी ऑर्केस्ट्रामध्ये डान्सर (Orchestra Dancer) असून बुधवारी रात्री गंगाघाट कोतवाली परिसरात वाढदिवसाच्या कार्यक्रमाला ती गेली होती.

यादरम्यान काही तरुणांनी तिला दारू मिसळून कोल्ड ड्रिंक पाजलं आणि नंतर तिच्यावर सहा आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. घटनेनंतर आरोपींच्या तावडीतून सुटका करून पीडितेनं तिच्या साथीदारांसह जाजमऊ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांत दिलेल्या तक्रारीत पीडितेनं म्हटलंय की, जाजमऊ चौकी परिसरातील दीपक नगर भागात माझ्यासोबत हे कृत्य घडलंय. इथं बुधवारी रात्री एका तरुणाच्या वाढदिवसानिमित्त ऑर्केस्ट्रा बुक करण्यात आला होता. या ऑर्केस्ट्रा पार्टीसोबत पीडित मुलगी या कार्यक्रमाला पोहोचली होती.

कार्यक्रमात मुली स्टेजवर नाचत होत्या. दरम्यान, पार्टी करणाऱ्या तरुणांपैकी एकानं मला दारू मिसळून कोल्ड ड्रिंक पाजलं आणि दारूच्या नशेत असणाऱ्या आरोपीनं मला अंधारात ओढून नेलं. त्यानंतर त्याच्या साथीदारसह सर्वांनी जबरदस्तीनं माझ्यावर बलात्कार केला. आरोपींनी मला जीवे मारण्याची धमकीही दिल्याचं पीडित डान्सरनं सांगितलं.

टॅग्स :Uttar PradeshCrime News