Nashik Child Marriage: मंगल कार्यालयांवर होणार गुन्हे दाखल; बालविवाह रोखण्यासाठी ZP प्रशासनाचे कडक पावले

Child Marriage
Child Marriageesakal

Nashik Child Marriage : जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने कडक पावले उचलेली असून बालविवाह ज्या मंगल कार्यालयात होतील, त्या मंगल कार्यालयावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच बालविवाह करण्यासाठी जे दलाल कार्यरत असतील त्यांच्यावरही फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल केले जातील, असे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी स्पष्ट केले. (Cases will be registered at Mangal offices Strict steps taken by ZP administration to prevent child marriage nashik)

केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाव बेटी पढाव’ योजनेसंदर्भात जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (ता.१८) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. श्रीमती मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली एक एप्रिलपासून जुलैच्या मध्यापर्यंत एकूण २८ बालविवाह रोखण्यात जिल्हा परिषदेला यश आले असल्याचे यावेळी जिल्हा बाल विकास कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे यांनी सांगितले.

महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या विशेष मोहीम बालविवाह करू नये, बालविवाहाचे दुष्परिणाम, बालविवाह होणार असल्याचे कळल्यास तक्रार कुठे करावी याबद्दल जनजागृती केली जात आहे.

जिल्हा प्रशासनाकडे बालविवाहांसंदर्भात गोपनीय तक्रारी प्राप्त झाल्या, त्यानुषंगाने कारवाई करत महिला व बालकल्याण विभागाने जिल्ह्यात २८ बालविवाह रोखले, यामध्ये नाशिक तालुक्यातील, सिन्नर, बागलाण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या भागांत बालविवाह रोखण्यात आले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Child Marriage
Nashik News: धानोरे येथील जवानाला अंतिम निरोप; आजोबा, आई-वडिलांनी फोडला हंबरडा, जनसमुदायाचे मन हेलावले

कारवाई केली जात असताना बाल विवाह थांबले जात नसल्याने त्याविरोधात, कडक पावले उचलण्याचा निर्णय बैठकीत झाला. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बालविवाह होणार अथवा झालेले आढळल्यास प्रशासनाच्यावतीने कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागात कुठेही बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यास १०९८ या क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा बाल विकास कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे यांनी केले आहे.

तसेच याचवेळी जिल्ह्यातील ज्या भागांत बालविवाह जास्त प्रमाणात होतात त्या भागात कायदेविषयक कार्यशाळा देखील घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Child Marriage
Nashik News: सुवर्णपदक विजेत्या कृष्णाला केंद्राचा आर्थिक मदतीचा हात; मंत्री डॉ. भारती पवार यांचा पाठपुरावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com