Nashik : पतीच्या नावाने पैसे काढणे भोवले; जऊळकेच्या महिला सरपंच ठरल्या अपात्र!

Sarpanch Disqualified
Sarpanch Disqualifiedesakal

येवला (जि. नाशिक) : कायद्याचे उल्लंघन करून विविध खर्चाच्या नावाखाली पतीच्या नावे पैसे काढणे महिला सरपंचाला चांगलेच भोवले. या कारणामुळे जऊळके येथील महिला सरपंच ज्योती खैरनार यांना अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी अपात्र घोषित केले. (cash Withdrawal under husband name female Sarpanch of Jaulke Jyoti Khairnar disqualified Nashik Latest Marathi News)

Sarpanch Disqualified
Nashik Cyber Crime News : महिला डॉक्टरला ऑनलाइन 1 लाख 43 हजाराचा गंडा!

यापूर्वी तालुक्यातील खैरगव्हाण ग्रामपंचायतीतही असाच प्रकार घडला आहे. तक्रारी झाल्या, तर अनेक गावांतही असे प्रकार उघडकीस येतात. तीन वर्षांपूर्वी जऊळके ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेतून निवडून आलेल्या सरपंच ज्योती खैरनार यांनी पदाचा दुरुपयोग करत पतीच्या नावाने धनादेश देऊन कुटुंबातील सदस्यांना आर्थिक फायदा करून दिला, अशी तक्रार सदस्य संतोष जाधव, संतोष खैरनार यांनी केली होती. त्यात गैरप्रकारे पतीच्या नावे धनादेश काढून पदाचा व निधीचा गैरवापर होत असल्याची तक्रार केली होती. त्यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे तक्रार अर्जावर कारवाई करून खैरनार यांचे सदस्य व सरपंचपद रद्दबातल करण्यात आले आहे.

आरोप सिद्ध झाल्याने सरपंच ज्योती खैरनार यांना अपात्र घोषित केल्याचे आदेशात म्हटले आहे. कोरोनाकाळात सोडियम क्‍लोराईडची फवारणी करणे तसेच टीसीएल पावडर खरेदी, तणनाशक खरेदी व जेसीबीचे बिल अदा करणे यासाठी पती प्रभाकर खैरनार यांना वेळोवेळी १२ हजार ५८४ रुपये रक्कम अदा केले. लोकप्रतिनिधीनी स्वतः किंवा कुटुंबाच्या फायद्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष व्यवहारात सहभागी होऊ नये, अशी तरतूद असतानाही त्यांनी पतीच्या नावाने रक्कम काढली आहे. अदा करण्यात आलेली रक्कम नाममात्र असली तरी ग्रामपंचायत अधिनियमाचा भंग झाल्यामुळे ही कारवाई झाली आहे. यापूर्वीही येवला तालुक्यात विविध कारणांवरून तीन ग्रामपंचायत सदस्य अपात्र झाले असून, आता जनतेतून निवडून आलेले सरपंचच अपात्र झाल्याने तालुक्यात हा चर्चेचा विषय झाला आहे.

Sarpanch Disqualified
Bhaubij 2022 : आदिवासी विधवा महिलेच्या घरी खाकी वर्दीची भाऊबीज!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com