आर्थिक वादातून जातीवाचक शिवीगाळ; 6 जणांविरोधात गुन्हा दाखल

nashik latest crime news
nashik latest crime newsesakal

नाशिक : जमिनीच्या आर्थिक देवाण-घेवाणातील पैशांची मागणी केली असता, जातीवाचक शिवीगाळ (Caste abuse) व विनयभंग (molestation) केल्याप्रकरणी गंगापूर गावातील सहा जणांविरोधात जातीवाचक शिवीगाळी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना या करीत आहेत. (Caste abuse from financial disputes case filed against 6 people nashik crime Latest Marathi News)

शंकर किसन शिंदे, हर्षद शंकर शिंदे, ओंकार शंकर शिंदे, अशोक किसन शिंदे, अमोल अशोक शिंदे, प्रशांत अशोक शिंदे (सर्व रा. गंगापूर गाव ता. नाशिक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

पीडित फिर्यादीच्या तक्रारीनुसार, त्यांच्या जमिनीचा व्यवहार झाला होता. याच जमिनीच्या आर्थिक देवाण घेवाणातील पैसे घेण्यासाठी फिर्यादी व त्यांची मुलगी हे गंगापूर गावातील संशयितांच्या घरी गेल्या ४ जून रोजी गेले होते.

nashik latest crime news
Nashik : तरुणीकडून तोंडावर स्प्रे मारून युवकाला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न

त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या सहाही संशयितांनी पैसे न देता, उलट पीडित व त्यांच्या मुलीला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच, संशयित अशोक शिंदे याने पीडितेच्या अंगाला हात लावून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत विनयभंग केला.

याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात विनयभंग व अनुसूचित जाती-जमाती अधिनियम १९८९ ३(१)(आर), ३(१)(एस)प्रमाणे ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्हयाचा तपास सरकारवाडा विभागाच्या सहायक पोलीस निरीक्षक दीपाली खन्ना या करीत आहेत.

nashik latest crime news
Nashik : प्रशस्त रस्त्यांच्या शहराला ‘Black Spot’ चे गालबोट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com