नाशिक- दहावी, बारावी परीक्षेच्या निकालानंतर पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जातपडताळणीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या नाशिक- १ व २ या विभागातील तब्बल ८२९ प्रकरणे निकाली निघाले आहेत. जूनमध्ये विद्यार्थ्यांचा ओघ वाढल्याने हा आकडा हजारांच्या पार पोहोचणार आहे.