अर्थकारणात केटरिंग व्‍यवसायाचे योगदान! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Catering Association of Nashik Contribution of catering business to finance nashik

अर्थकारणात केटरिंग व्‍यवसायाचे योगदान!

नाशिक : कोरोनाकाळात अन्‍य विविध व्‍यवसायांप्रमाणे केटरिंग व्‍यवसायदेखील प्रभावित झालेला होता. परंतु, आता परिस्थिती पूर्वपदावर येत असून, आगामी हंगामाकडे व्‍यवसायिकांचे लक्ष लागून आहे. रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता असल्‍याने केटरिंग व्‍यवसाय शहराच्‍या अर्थकारणात महत्त्वपूर्ण योगदान देत असल्‍याचे मत बुधवारी (ता. ६) मान्यवरांनी व्‍यक्‍त केले. केटरिंग असोसिएशन ऑफ नाशिक (कॅन) यांच्‍यातर्फे झालेल्‍या राज्‍यस्‍तरीय अधिवेशनात सहभागी होताना मान्‍यवरांनी उपस्‍थित व्‍यावसायिकांना मार्गदर्शन केले. यानिमित्त प्रदर्शनदेखील भरविण्यात आले होते. उद्‌घाटन कार्यक्रमास फेडरेशन ऑफ ऑल इंडिया केटरर्सचे सचिव किरीट बुद्धदेव उपस्‍थित होते.

याप्रसंगी फेडरेशन ऑफ ऑल इंडिया केटरर्सचे कोषाध्यक्ष समीर पारेख, सहसचिव देवेंद्र कोटेचा, दक्षिण विभागाचे प्रमुख अतुल मेहता, महाराष्ट्र स्टेट केटरिंग फेडरेशनचे सचिव विपुल बधीयानी, उपाध्यक्ष दादू भाई पुरोहित, महेश लाहोटी व कोषाध्यक्ष पुरुषोत्तम जयपुरिया, केटरिंग असोसिएशन ऑफ नाशिकचे अध्यक्ष उत्तम गाढवे, कार्याध्यक्ष अनिल जोशी, उपाध्यक्ष पंकज पाटील, सचिव वैभव नातू आणि कोषाध्यक्ष स्वप्नील शिंदे आदी उपस्थित होते. या वेळी किरीट बुद्धदेव म्हणाले, की सद्यःस्थितीत सर्व साहित्याचे दर सुमारे तीस टक्क्यांहून अधिक वाढले आहे. तरीही योग्‍य नियोजन केल्‍यास याचा भार ग्राहकांवर येणार नाही. महाराष्ट्र स्टेट केटरिंग फेडरेशन व केटरिंग असोसिएशन ऑफ नाशिकचे अध्यक्ष उत्तम गाढवे म्हणाले, की केटरिंग उद्योग हा कुशल व अकुशल कामगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार देतो. प्रत्येक शहरातील अनेक लहान मोठ्या व्यावसायिकांचा व्यवसायदेखील केटरिंग उद्योगावर अवलंबून आहे. अधिक प्रभावीपणे केटरिंग व्‍यवसाय करण्यासाठी अधिवेशन, प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावले.

कार्यक्रमात सुरवातीस वैभव नातू यांनी स्वागत केले. समन्वयक राहुल भावे यांनी प्रास्ताविक केले. पंकज पाटील यांनी आभार मानले. अधिवेशनासाठी राज्यातील विविध शहरातील चारशेहून अधिक केटरिंग व्यावसायिक उपस्थित असल्‍याचे आयोजकांनी सांगितले.

यांचे लाभले मार्गदर्शन

अधिवेशनात देशातील केटरिंग उद्योगातील नामवंत वक्त्यांना आमंत्रित केले होते. त्यांनी केटरिंग उद्योगातील विविध पैलूंवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वक्त्यांमध्ये तब्बल ९० मिनिटे डोळे बंद करून स्वयंपाक करण्याचा विक्रम करणारे शेफ पराग कान्हेरे, प्रसिद्ध प्रशिक्षक अतुल ठाकूर व नॅशनल असोसिएशन ऑफ कॉर्पोरेट कॅटरिंगचे राष्ट्रीय अध्यक्ष गुरुविंदर बिंद्रा यांनी सभासदांना मार्गदर्शन केले.

Web Title: Catering Association Of Nashik Contribution Of Catering Business To Finance Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top