Call Centers
sakal
नाशिक: शहरात सुरू असलेल्या बेकायदा कॉल सेंटरवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) धाड टाकून उद्ध्वस्त केले आहेत. या प्रकरणी सीबीआयने दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. तर, चौघांसह एक शासकीय सेवक व अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अटक केलेल्या दोघांना सोमवार (ता. १५)पर्यंत सीबीआय कोठडी ठाण्याच्या विशेष सीबीआय न्यायालयाने सुनावली आहे.