CBSE Board Exam 2024 : सीबीएसई बोर्डाच्‍या आजपासून परीक्षा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) यांच्‍यातर्फे राष्ट्रीय पातळीवर दहावी-बारावीच्‍या लेखी परीक्षांना गुरुवार (ता. १५)पासून सुरवात होत आहे.
CBSE Board Exam 2024
CBSE Board Exam 2024esakal

CBSE Board Exam 2024 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) यांच्‍यातर्फे राष्ट्रीय पातळीवर दहावी-बारावीच्‍या लेखी परीक्षांना गुरुवार (ता. १५)पासून सुरवात होत आहे.

नाशिक शहरासह जिल्‍हापातळीवर असलेल्‍या सीबीएसई शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाण्यासाठी सज्‍ज झाले आहेत. (CBSE Board Exam from today nashik news)

तर महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे होणाऱ्या बारावीच्‍या परीक्षांचा काउंटडाउन सुरू झाला आहे. करिअरच्या दृष्टीने दहावी-बारावीचा टप्‍पा महत्त्वाचा मानला जातो. त्‍यामुळे विद्यार्थ्यांकडून काही दिवसांपासून परीक्षेच्‍या तयारीची लगबग सुरू होती.

CBSE Board Exam 2024
CBSE Board Exam 2023 : दहावी-बारावीचं वेळापत्रक आलं; 15 फेब्रुवारीपासून परिक्षा

अखेर परीक्षेचा क्षण आलेला असून, विद्यार्थी लेखी परीक्षेला सामोरे जाण्यासाठी तयार झाले आहेत. नाशिक शहरासह जिल्‍हाभरात सीबीएसई शिक्षण मंडळाशी संलग्‍न शाळा आहेत. या परीक्षा केंद्रांवर परीक्षेची तयारी करण्यात आली आहे.

दहावीची परीक्षा १३ मार्च, तर बारावीची‍ परीक्षा २ एप्रिलपर्यंत रू राहणार आहे. दुसरीकडे पुढील बुधवार (ता. २१)पासून महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे परीक्षा घेतल्‍या जाणार आहेत. त्‍यापाठोपाठ दहावीच्‍या लेखी परीक्षा पार पडतील.

CBSE Board Exam 2024
CBSE Board Exam 2021:कोरोनाची लागण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी CBSE ची मोठी घोषणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com