CCTV Network
sakal
नाशिक: अवघ्या दीड-पावणेदोन वर्षावर येऊन ठेपलेल्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर आयुक्तालय हद्दीतील तिसरा डोळा सुरू होण्यास मुहूर्त लागू शकलेला नाही. गेल्या २०१५-१६ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सांगता सोहळ्याप्रसंगी शहरात कायमस्वरूपी सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.