नाशिक- रंगपंचमी बुधवारी (ता. १९) होणार आहे. नाशिकची रहाडीची रंगपंचमी राज्यात प्रसिद्ध आहे. पेशवेकालीन रहाडी रंगपंचमीला खुल्या केल्या जातात. परंतु, अलीकडे शहरात शॉवर रंगपंचमीची पद्धत रूढ होते आहे. असे असले तरी पारंपरिक नैसर्गिक रंगांऐवजी आता रासायनिक रंगांचा वापर वाढला आहे.