नाशिक- नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये २०२६-२७ मध्ये भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महामार्ग, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी), मल्टिमॉडेल हब यांसारख्या प्रकल्पांच्या उभारणीसाठी केंद्र सरकारचे पूर्ण सहकार्य लाभेल. संबंधित विभागांनी या प्रकल्पांचा केंद्रीय योजनांमध्ये समावेश करून त्याचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश पंतप्रधान कार्यालयाचे सचिव तरुण कपूर यांनी राज्याला दिले, अशी माहिती सूत्रांनी दिली.