नाशिक: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने सुरू केलेल्या नवीन कर्ज सामोपचार परतफेड योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बॅंकेचे प्रशासक संतोष बिडवई यांनी पत्रकार परिषदेत केले. या योजनेला शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, पहिल्याच दिवशी पाच थकबाकीदारांनी सुमारे २५ लाख रुपयांचे कर्ज फेडल्याची माहिती त्यांनी दिली.