Central Crime Branch Seizes Illegal Cigarettes in Nashik : नाशिक मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने सिडको परिसरातील स्वामी विवेकानंदनगर येथे छापा टाकून प्रतिबंधित, बनावट आणि मुदतबाह्य असलेल्या ₹२,५६,८५५ मूल्याचा अवैध सिगारेटचा साठा जप्त केला.
नाशिक: मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने सिडको येथील स्वामी विवेकानंदनगर येथे कारवाई करीत दोन लाख ५६ हजार ८५५ रुपयांचा अवैध सिगारेट साठा जप्त करून संशयितास ताब्यात घेतले. सुनील रघुनाथ मुसळे (वय ४९, रा. सिडको) असे संशयिताचे नाव आहे.