Central Head Recruitment : केंद्रप्रमुख भरतीला सापडला मुहूर्त; शेवटच्या आठवड्यात ऑनलाइन परिक्षा

online exam
online examesakal

Central Head Recruitment : राज्यभरात गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतिक्षा लागून असलेल्या केंद्रप्रमुख भरतीसाठी मुहूर्त सापडला आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ऑनलाइन प्रणालीद्वारे परिक्षा घेण्याचे निश्चित झाले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या आयुक्त शैलजा दराडे यांच्या स्वाक्षरीचे आज परिपत्रक जारी करण्यात आले आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाने नुकतीच राज्याच्या परीक्षा पद्धतीतील फसव्या कारवायांवर कारवाई केली आहे.

परिणामी, बोर्डाने भविष्यातील सर्व परीक्षा इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) मार्फत घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रप्रमुख भरतीबाबत १५ फेब्रुवारी २०२३ अंकात ‘सकाळ’ मध्ये बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. (Central Head Recruitment Online exam in last week of june nashik news)

या केंद्रप्रमुख भरतीसाठी ६ जूनपासून ऑनलाइन नोंदणीला सुरवात होणार असून १५ जूनपर्यंत अंतिम मुदत आहे. या परिक्षेसाठी सर्व संवर्गासाठी ९५० तर दिव्यांग उमेदवारांसाठी ८५० रुपये परिक्षा शुल्क ठरविण्यात आले आहे.

तसेच पात्रता, अर्हता, निकष व इतर आनुषंगिक माहितीचे परिपत्रकही राज्य परिक्षा परिषदेने जाहीर केले आहे. दरम्यान, आयबीपीएस ही एक प्रतिष्ठित कंपनी आहे. जी बँकिंग क्षेत्र आणि इतर सरकारी विभागांसाठी विविध परीक्षा घेते.

या कंपनीमार्फत परीक्षा घेण्याचा निर्णय हा परीक्षा प्रक्रियेची अखंडता सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. परीक्षेचा निकाल जूनच्या अंतिम टप्यांत जाहीर करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

online exam
Onion Rates : बांगलादेशचा आयात खुली निर्णय होताच; कांद्याच्या भावात साडेतीन रुपयांची वृद्धी!

तसेच जून अखेरपर्यंत केंद्रप्रमुखांची निवड पूर्ण करून त्यांना नियुक्ती देणेबाबत कार्यवाही होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रप्रमुख या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी स्वतःची नोंदणी करण्यासाठी आयबीपीएसच्या अधिकृत संकेतस्थळ सुरू करण्यात येणार आहे. नोंदणी प्रक्रिया सोपी आहे आणि ती ऑनलाइन पूर्ण केली जाऊ शकते.

दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षेतेखाली २६ मे रोजी पुणे येथे झालेल्या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या सूचनेनुसार आयबीपीएस प्रणाली अंतर्गत घेण्यात येणारी केंद्रप्रमुख पदाची परीक्षा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचे प्रस्तावित असलेबाबत झालेल्या मिटिंगमध्ये सांगण्यात आले होते.

तसेच जून महिन्यातच परीक्षा घेऊन परीक्षेचा निकाल जूनच्या अंतिम टप्यांत दरम्यान जाहीर करण्याबाबत तसेच जून अखेरपर्यंत केंद्रप्रमुखांची निवड पूर्ण करून त्यांना नियुक्ती देणे बाबत कार्यवाही होण्याचे संकेत दिसत आहेत.

online exam
Nashik News: नाशिकच्या उंटासाठी संजीवनी ठरले गुजरातचे श्रीमद् राजचंद्र मैत्रीधाम!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com