Christmas Special Trains
sakal
नाशिक रोड: नाताळ, नववर्ष आणि हिवाळी सुट्यांमध्ये वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने अतिरिक्त प्रवासी मागणी पूर्ण करण्यासाठी विविध हिवाळी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमध्ये मुंबई- नागपूर, पुणे- नागपूर आणि पुणे- अमरावती या मार्गावरील साप्ताहिक गाड्यांचा समावेश असून, डिसेंबर ते जानेवारीदरम्यान प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध होतील.