सातपूर: नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीतील केंद्रीय वखार महामंडळाच्या गुदामात अनेक व्यापाऱ्यांनी आपला किराणा माल, मसाले, मिरची, तांदूळ, सुकामेवा व भुसार वस्तूंची साठवणूक केली आहे. हे गुदाम भाडेतत्त्वावर गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथील आरजेव्हीएम प्रॉडक्ट कंपनी या ठेकेदाराकडे दिले आहे. मात्र, ठेकेदाराने महामंडळाचे भाडे थकविल्यामुळे महामंडळाने कारवाई करत व्यापाऱ्यांचा माल सील केला असून, अवघ्या एका दिवसाच्या नोटिशीवर लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे.