esakal | VIDEO : इराण आणि पाकिस्तानचा कांदा भारतात आणून केली शेतकऱ्यांची अडचण - छगन भुजबळ
sakal

बोलून बातमी शोधा

Chhagan Bhujbal

कांदा उत्पादन करणारा शेतकरी हा अतिशय गरीब असतो, शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव हा कधीतरी मिळतो पण भाव खाली आला तर मात्र कांदा अगदी फेकून द्यावा लागतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दुप्पट हमीभावाचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले असा सवाल भुजबळ यांनी विचारला.

VIDEO : इराण आणि पाकिस्तानचा कांदा भारतात आणून केली शेतकऱ्यांची अडचण - छगन भुजबळ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : केंद्र सरकारने कांदा प्रश्नांसंदर्भात घेतलेल्या निर्णयावर गेल्या काही दिवसांपासून शेतकरी वर्गात मोठी नाराजी आहे. काही दिवसांपासून कांद्याचे लिलाव देखील बंद आहेत याचा थेट परिणाम हा कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर होत असतो. कांद्याच्या प्रश्नांबाबत भारत सरकारच्या वतीने जे निर्णय घेण्यात येत आहेत ते महाराष्ट्र व इतर राज्यातील शेतकऱ्यांना अडचणीचं ठरत आहेत असे मत अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

कधीतरी आता शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या कांद्याला चांगले भाव मिळायला सुरवात झाली तर नियम आणि अटी टाकून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केंद्र सरकार करत असल्याची टिका छगन भुजबळ यांनी केली आहे.

दुप्पट हमीभावाच्या आश्वासनाचे काय झाले? 

कांदा उत्पादन करणारा शेतकरी हा अतिशय गरीब असतो, शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव हा कधीतरी मिळतो पण भाव खाली आला तर मात्र कांदा अगदी फेकून द्यावा लागतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दुप्पट हमीभावाचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले असा सवाल करून ते म्हणाले की, मधल्या काळात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवल होते आता सर्व बाजारपेठा चालू झाल्या असताना सुरवातीला केंद्राने निर्यात बंदी आणली त्यानंतर इराण आणि पाकिस्तानचा कांदा भारतात आणला कांद्याच्या व्यापाऱ्यांवर अनेक ठिकाणी इन्कम टॅक्सच्या धाडी टाकण्यात आल्या. त्यानंतर कांदा साठवणुकीला मर्यादा आणण्यात आल्या अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. कांद्याच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खा. शरद पवार यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती देखील मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ

loading image
go to top