esakal | ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ
sakal

बोलून बातमी शोधा

anushka divte.jpg

दसऱ्याचा तो दिवस..त्या दिवशी आजोबा दोन घास नातीच्या हातचे खातील यासाठी अनुष्का त्यांना जेवणाचा डबा देण्यासाठी गेली होती. आजोबांना जेवण दिल्याचे समाधान मिळाल्यानंतर ती पुन्हा घराकडे परतली. पण ऐन दसऱ्याच्या दिवशीच काळाचा घाला आला. काय घडले नेमके वाचा.. 

ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ

sakal_logo
By
अंबादास शिंदे

नाशिक रोड : दसऱ्याचा तो दिवस..त्या दिवशी आजोबा दोन घास नातीच्या हातचे खातील यासाठी अनुष्का त्यांना जेवणाचा डबा देण्यासाठी गेली होती. आजोबांना जेवण दिल्याचे समाधान मिळाल्यानंतर ती पुन्हा घराकडे परतली. पण ऐन दसऱ्याच्या दिवशीच काळाचा घाला आला. काय घडले नेमके वाचा.. 

आजोबांना जेवण दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय

बारावी उत्तीर्ण झालेली अनुष्का दिवटे (रा. पद्मावती सोसायटी, बिटको महाविद्यालयामागे, नाशिक रोड) दुपारी चारच्या सुमारास दुचाकी (एमएच १५, डीझेड ७९५६)वरून घरी चालली होती. दसऱ्यामुळे अनुष्का दिवटे डीजीपीनगरमधील आजोबा निवृत्ती पवार यांना जेवणाचा डबा देण्यासाठी गेली होती. आजोबांना जेवण दिल्याचे समाधान मिळाल्यानंतर ती पुन्हा घराकडे परतत होती. अशातच सेंट झेवियर शाळेसमोर मागून आलेल्या ट्रक (एमएच २४, एफ ९७८६)ने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यात अनुष्का खाली पडली. अंगावरून ट्रक गेल्याने ती जागीच ठार झाली. अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळापासून जवळच उपनगर पोलिस ठाणे व शाळा असूनही वाहनांचा वेग कमी करण्याचा फलक नाही. जय भवानी रोडकडे वळताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला गतिरोधक आहेत. मात्र, गतिरोधकाचाही फलक नाही. गतिरोधकावर पांढरे पट्टे नाहीत. तीन दिवसांपूर्वीच जेल रोडच्या कन्याशाळेसमोर ट्रकच्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू झाला होता. 

हेही वाचा >  पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

अनुष्काच्या वडिलांचे १२ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. आई सुवर्णा दिवटे शासकीय नोकरीला आहेत. लहान भाऊ स्वरूप दिवटे सातवीमध्ये शिकत आहेत. नाशिक-पुणे महामार्गावर नेहरूनगरजवळ सेंट झेवियर हायस्कूलसमोर नाशिकहून नाशिक रोडकडे जाणाऱ्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने १८ वर्षीय तरुणी ठार झाली. हा अपघात रविवारी (ता. २५) दुपारी चारच्या सुमारास झाला. अनुष्का रवींद्र दिवटे असे मृत तरुणीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

हेही वाचा > हाऊज द जोश! पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशकात दाखल;


 

go to top