CET Exam Result : सीईटी परीक्षांचा निकाल जाहीर; आता ‘कॅप राउंड’च्‍या प्रक्रियेकडे लक्ष

cet-exam-result
cet-exam-resultsakal media

Nashik News : विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्‍या सीईटी परीक्षांचा निकाल ऑनलाइन जाहीर झाला आहे.

विद्यार्थ्यांना त्‍यांची वैयक्‍तिक माहिती दाखल करून गुणपत्रिका प्राप्त करून घेता येणार आहे. दरम्‍यान, आता कॅप राउंडच्‍या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (cet exam result Attention to the process of cap round nashik news)

राज्‍यस्‍तरावरील विविध विद्यापीठांशी संलग्‍न महाविद्यालयांत पदवी व पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे सीईटी परीक्षा घेण्यात आली होती. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता राबविल्‍या गेलेल्‍या या प्रक्रियेत २५ मार्चला एमबीए अभ्यासक्रमाच्‍या सीईटीपासून परीक्षेला सुरवात झाली होती.

आता टप्प्‍याटप्प्‍याने या परीक्षांचे निकाल जाहीर होत आहेत. बहुतांश सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून, एमएचटी-सीईटी व अन्‍य काही परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्‍यता आहे. दरम्‍यान, आता सीईटीचे निकाल लागल्‍याने कॅप राउंड प्रक्रियेकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

cet-exam-result
CET परिक्षेला जाताय? या गोष्टी विसरू नका,नाहीतर परिक्षेला मुकाल

सीईटीचे जाहीर निकाल असे

विधी शाखेतील तीन आणि पाच वर्षे कालावधीच्‍या एलएलबी अभ्यासक्रमाच्‍या सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी शाखेतील पदवी (बी. एचएमसीटी), पदव्‍युत्तर पदवी (एम. एचएमसीटी) सीईटी शिक्षणशास्त्र शाखेतील बीए/बीएस्सी. बी.एड. (इंटिग्रेटेड) सीईटी परीक्षेचा निकालही जाहीर झाला आहे. बी. प्‍लॅनिंग, एम. आर्क., फाइन आर्ट (एएसी-सीईटी), एम. पीएड., एमसीए, बी. डिझाइन सीईटी या परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे.

cet-exam-result
Nashik News: महामार्गावरील CCTVचा नाशिककरांना फायदा! कसारा ते नाशिक मार्गावर कॅमेरे बसविण्याची मागणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com