नाशिक- आडगाव शिवारातील कोणार्कनगर येथून पादचारी महिलेची पोत बळजबरीने हिसकावून पोबारा करणाऱ्या दुचाकीस्वारांचा आडगाव पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग केला. अंबड औद्योगिक वसाहतीत संशयितांनी दुचाकी सोडून पलायन करीत असताना पोलिसांनी एका संशयिताला शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत.