नाशिक- म्हसरुळ परिसरामध्ये सोनसाखळी चोरट्यांनी तीन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या खेचल्या तर, एका युवकाच्याही गळ्यातील सोन्याची चैन खेचून नेल्या. दोन महिलाच्या सोनसाखळ्या तर अवघ्या दहा मिनिटात खेचून नेल्याचा प्रकार घडला आहे. दोन दिवसात चार जबरी चोरीच्या घटनेने म्हसरुळ हद्दीतील महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.