गंगापूर रोड, उपनगरला पोत ओरबाडली; महिलांमध्ये दहशत

Chain snatcher latest marathi news
Chain snatcher latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : गंगापूर रोड परिसरातील डीकेनगर आणि उपनगरच्या रामेश्‍वरनगरजवळ अज्ञात दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने खेचून पोबारा केला. एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटनांनी महिलांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. (chain snatching at Gangapur Road upnagar area Terror among women nashik Latest crime news)

आशा बाळकृष्ण घायवटे (रा. मानसी अपार्टमेंट, जुना सायखेडा रोड, जेल रोड) शनिवारी (ता. ३०) रात्री साडेआठच्या सुमारास सैलानीबाबा स्टॉपवरील मेडिकलमधून औषधे खरेदी करून घराकडे पायी जात होत्या.

रामेश्‍वरनगरजवळील गणपती मंदिराजवळ समोरून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोघे संशयित आले आणि आशा घायवटे यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची, ६० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण बळजबरीने ओढून पोबारा केला.

दुचाकीस्वाराने लाल रंगाचे हेल्मेट घातले होते, तर पाठमागे बसलेल्या संशयिताने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता. याबाबत उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, सहाय्यक निरीक्षक सागर डगळे तपास करीत आहेत.

Chain snatcher latest marathi news
धुळीने नाशिककर बेजार; नेत्रविकारांत वाढीची भीती

तर, दुसरी घटना गंगापूर रोडच्या डीकेनगर परिसरात घडली. भाग्यश्री आनंद बुटे (रा. ज्ञानयोग सोसायटी, शांतिनिकेतन कॉलनी, गंगापूर रोड) शनिवारी (ता. ३०) रात्री साडेआठच्या सुमारास आकाशवाणी भाजी मार्केडकडून डीकेनगरकडे घराकडे पायी जात होत्या.

धी. पुरी यांच्या बंगल्यासमोर पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या संशयिताने त्यांच्या गळ्यातील ३० हजारांची एक तोळ्याची सोन्याची चैन बळजबरीने खेचून मॉर्डन मार्केटच्या दिशेने भरधाव वेगात पसार झाले. याबाबत गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, उपनिरीक्षक भिसे तपास करीत आहेत.

Chain snatcher latest marathi news
हर हर भोलेचा गजर करीत 1 लाख भाविकांनी घेतले त्रंबकेश्वराचे दर्शन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Vidhan Parishad Election
What caused traffic congestion at Dwarka Chowk?
Declining rainy days impact on Nashik agriculture
Onion Purchase Irregularities Worth ₹54 Crore Surface; Investigation Demand Grows
Marathi News Esakal
www.esakal.com