Nashik News : ...तर त्र्यंबकेश्वर उपबाजाराची व्याप्ती वाढविणार : सभापती देवीदास पिंगळे

MLA Hiraman Khoskar, former MP and Chairman of Agricultural Produce Market Committee Devidas Pingle, Deputy Chairman and Board of Directors while cutting the ribbon of the sub-market premises.
MLA Hiraman Khoskar, former MP and Chairman of Agricultural Produce Market Committee Devidas Pingle, Deputy Chairman and Board of Directors while cutting the ribbon of the sub-market premises.esakal
Updated on

Nashik News : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन उपबाजार आवार सुरू करण्यात आला आहे. या बाजाराला शेतकरी व व्यापारी यांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर भविष्यात १७ एकरमध्ये या उपबाजाराची व्याप्ती वाढविण्याचा मानस आहे, असे प्रतिपादन माजी खासदार तथा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांनी केले.

त्र्यंबकेश्वर येथे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्र्यंबकेश्वर उपबाजार आवाराच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.(Chairman Devidas Pingle statement of Trimbakeshwar will increase scope of sub market nashik news)

या वेळी इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपसभापती उत्तमराव खांडबहाले, संचालक संपतराव सकाळे, युवराज कोठुळे, राजाराम धनवटे, तानाजी करंजकर, धनाजी पाटील, प्रल्हाद काकड, संदीप पाटील, विनायक माळेकर, जगन्नाथ कटाळे, भास्करराव गावित, संचालिका सविता तुंगार, निर्मला कड, सचिव प्रकाश घोलप, अभियंता रामदास रहाडे, सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्रीनाथ थेटे, ज्येष्ठ संचालक विष्णुपंत म्हैसधुणे, भाऊसाहेब खांडबहाले, योगेश तुंगार, कैलास चोथे, त्र्यंबकेश्वर सोसायटी अध्यक्ष बहिरू कोठुळे, माजी उपाध्यक्ष उमेश सोनवणे, संचालक अरुण दाते, नगर परिषद अधिकारी विजय सोनार यांच्यासह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक व अन्य मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात सभापती पिंगळे म्हणाले, की शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी ४० ते ४५ किलोमीटरवर जावे लागत होते. मात्र आता त्यांचा हा खर्च कमी होऊन वेळेची बचत होणार आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीकडे त्यांना लक्ष देता येईल, या दृष्टीनेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी उपबाजार आवार सुरू करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची उत्पादनक्षमता वाढण्यासदेखील मदत होणार असल्याचा विश्वास सभापती पिंगळे यांनी व्यक्त केला.

MLA Hiraman Khoskar, former MP and Chairman of Agricultural Produce Market Committee Devidas Pingle, Deputy Chairman and Board of Directors while cutting the ribbon of the sub-market premises.
Nashik News: चांदवडच्या शेतकऱ्यांना 2 वर्षांनी नुकसानभरपाई : डॉ. राहुल आहेर

आमदार हिरामण खोसकर म्हणाले, की शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करता सभापती देवीदास पिंगळे व संचालक मंडळाने त्र्यंबकेश्वर उपबाजार आवार तयार केला आहे. याबद्दल त्र्यंबकेश्वरवासीयांच्या वतीने संपूर्ण संचालक मंडळाचे मी आभार मानतो. शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च वाचून शेतमाल विक्रीतून उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी सदर उपबाजार हा लवकरात लवकर कार्यरत करावा, अशी मागणी त्यांनी केली.

संपतराव सकाळे म्हणाले, की सभापती पिंगळे यांनी आपल्या कार्यकाळात कृतिशील विचारांतून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास साधला आहे. त्र्यंबकेश्वर उपबाजार आवाराची वास्तू उभी करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल यासंदर्भातील जुन्या आठवणींना उजाळादेखील दिला. बाजार समितीचे संचालक युवराज कोठुळे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. उपसभापती उत्तमराव खांडबहाले यांनी आभार मानले.

MLA Hiraman Khoskar, former MP and Chairman of Agricultural Produce Market Committee Devidas Pingle, Deputy Chairman and Board of Directors while cutting the ribbon of the sub-market premises.
Nashik News: शिवपुराण कथावाचक पंडित प्रदिप मिश्रा यांनी केला श्री कपालेश्वर महादेवास जलाभिषेक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com