सनातन विकासासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे

सनातन विकासासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे
Published on: 
NSK26H31966 जळगाव : ‘चला जाणूया नदीला’ या महाराष्ट्र नदी संवर्धन अभियानाच्या तीनदिवसीय कार्यशाळेचे उद्‌घाटन करताना अजित जैन, जल तज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह, सत्यनारायण बोल्लीसेटी, नरेंद्र चुघ आदी. --- सनातन विकासासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे उपशीर्षक डॉ. राजेंद्र सिंह : ‘चला जाणूया नदीला’ कार्यशालेचे उद्‌घाटन जळगाव, ता.११ : नदी प्रवाहीत होत असते, तेव्हा ती समानतेला सोबत घेऊन येते. देशाचा विकास हा सनातन म्हणजे सदैव नित्य नूतन असावा. त्यात नद्यांना उजाड, विनाश करणारा नसावा. नदीला प्रदूषण, अतिक्रमण, पाण्याचे शोषणापासून मुक्त केले पाहिजे, असे विचार जल तज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी मांडले. जैन हिल्स येथे सुरू झालेल्या ‘चला जाणूया नदीला’ महाराष्ट्र नदी संवर्धन अभियानाच्या कार्यशाळेच्या उन्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी रोहन घुगे अध्यक्षस्थानी होते. जैन इरिगेशन कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, जलबिरादरीचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यनारायण बोल्लीसेटी, नरेंद्र चुघ, उज्ज्वलकुमार चव्हाण, शेखर निंबाळकर, गोपाळ पाटील, सतीश गोगुलवार आदी उपस्थित होते. जैन हिल्सच्या परिश्रम हॉलमध्ये मंगळवार (ता. १३)पर्यंत होणाऱ्या कार्यशाळेत राज्यातून नदी प्रहरी उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील १०८ नद्यांच्या शास्त्रोक्त पद्धतीने अहवाल तयार करून त्यावर पुढची दिशा ठरविण्यात येणार आहे. शासन- प्रशासन, समाज यांच्या एकत्रित प्रयत्नातून या नद्यांचे ‘उगम ते संगम’दरम्यान करायवयाच्या उपाययोजनांवर कृतिशील आरखडा तयार असल्याचे प्रास्ताविकामध्ये नरेंद्र चुघ यांनी सांगितले. पाण्याच्या प्रत्येक थेंबात ऊर्जा : अजित जैन नदीसोबत आपलेपणाचा व्यवहार केला पाहिजे, असे सांगत पाण्याचे संवर्धन करण्याच सल्ला अजित जैन यांनी दिला. पाण्याच्या प्रत्येक थेंबात ऊर्जा आहे. तिचा कार्यक्षमतेने वापर झाला पाहिजे. कमीत कमी पाण्यातून जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल, यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. नदीचे संवर्धन खऱ्या अर्थाने होईल, त्यासाठी सांडपाण्याचा पुर्नवापर केला पाहिजे, असे ते म्हणाले. उज्ज्वलकुमार चव्हाण यांनी पाच पाटील ही संकल्पना नदी प्रहरींना समजून सांगितली. मान्यवरांच्या हस्ते गिरणा नदीवरील अहवाल जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. जिल्हाधिकारी घुगे यांनी तापी जलपुर्नभरण, गिरणा नदीवरील बंधारे, भागपूर व बोदवड उपसा सिंचन, वाघूर प्रकल्प, तसेच शेततळ्यांची सविस्तर माहिती दिली. कृती संगमातून योजनांना मूर्त स्वरूप देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. जल बिरादरीचे अंकुश नारायणकर यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com